अकोला, दि. १३ : पातूर तालुक्यातील जांभरुण येथील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्या भोंदूबाबास पातूर पोलिसांनी अटक के ली. त्यानंतर आरोपीस मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने या भोंदूबाबास १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जांभरुण येथील अल्पवयीन मुलगी परभणी येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेते. या मुलीला कथित महाराज राजेश्वर कृष्णराव पोन्नालवार रा. जांभरुण व त्याचा सहकारी करण विलास जाधव रा. बाभूळगाव यांनी जडीबुटी व मंत्रोपचाराच्या मदतीने फूस लावून पळविले होते. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पातूर पोलिसात धाव घेऊन त्या मुलीची सुटका करण्याची मागणी केली होती. पातूर पोलिसांनी या मुलीची सुटका करून तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी महाराज राजेश्वर पोन्नालवार व करण विलास जाधव यांच्याविरुद्ध कलम ३६३, ३६१, ३७६, ३४ भादंवि, पास्को कायदा ३, ४, महाराष्ट्र नरबळी व इतर अधिनियम, जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायदा ३ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर भोंदू राजेश्वर पोन्नालवार याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी आरोपी भोंदूकडून अँड. केशव एच. गिरी, वैशाली गिरी व भारती यांनी कामकाज पाहिले.
लैंगिक शोषण करणा-या भोंदूबाबास पोलीस कोठडी
By admin | Published: September 14, 2016 2:09 AM