अकोला - रेल्वे स्टेशनसमोरील मराठा मंदिर वाइन बारमध्ये दारू पित असलेल्या एका युवकाजवळून स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीची पिस्तूल जप्त करून त्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. गड्डम प्लॉट येथील रहिवासी राकेश ऊर्फ रॉकी दुबे (२३) हा मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देशी बनावटीची पिस्तूल घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने मराठा मंदिर वाइन बारमध्ये छापा मारून रॉकी दुबे याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीची एक पिस्तूल पोलिसांना आढळली. रेल्वे स्टेशन समोरील मराठा मंदिर वाइन बारमध्ये दारू पिल्यानंतर रॉकी दुबे याने या परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. या प्रकरणी रॉकीविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणा-यास पोलीस कोठडी
By admin | Published: September 24, 2015 1:38 AM