अकोला : काळी जादू तसेच भूत-भानामतीचा धाक दाखवत गत १५ वर्षांपासून सिंधी कॅम्पमधील एका युवतीला लुटणार्या खंडणी बहाद्दर महिलेस खदान पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी महिलेस २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तिच्याकडून ५0 हजार रुपयांची खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.सिंधी कॅम्पमधील पक्की खोली येथील रहिवासी काजल कमलकुमार चंदवानी (२७) या युवतीच्या घरी गत १५ वर्षां पूर्वी निमवाडी परिसरातील रहिवासी आरती संतोष खरे नामक महिला घरकाम करण्यासाठी येत होती. यादरम्यान काजल चंदवानी हिची प्रकृती ठीक राहत नसल्याने आरती खरे या महिलेने तिला काळी जादू येत असल्याचे सांगत आजार बरे करण्याच्या नावाखाली खंडणी उकळणे सुरू केले. अंगात बाबा येत असल्याचे सांगून त्या बाबाच्या माध्यमातून काजलचे सर्व आजार ठीक करण्याचीही नाटकबाजी करण्यात आली; मात्र हा प्रकार युवतीच्या लक्षात येताच तिने सदर प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात केली. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी आरती खरे हिला ५0 हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात अटक केली. ितच्याकडून ५0 हजार रुपये जप्त करण्यात आले असून, आणखी काही दागिने मिळण्याची शक्यता आहे. या महिला आरोपीस खदान पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी महिलेस २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या महिलेने काजल चंदवानी यांचा विवाह ४ डिसेंबर २0१६ रोजी झाल्यानंतर काजलच्या मोबाइलवर वारंवार संपर्क करीत तिला खंडणी मागितली. एवढेच नव्हे, तर आरती खरे ही महिला मध्य प्रदेशातही जाऊन आली. पैसे व दागिने देण्यास नकार देताच काळी जादू करीत काजलची आजी, आई-वडील व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
खंडणी बहाद्दर महिलेस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:30 AM
अकोला : काळी जादू तसेच भूत-भानामतीचा धाक दाखवत गत १५ वर्षांपासून सिंधी कॅम्पमधील एका युवतीला लुटणार्या खंडणी बहाद्दर महिलेस खदान पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी महिलेस २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तिच्याकडून ५0 हजार रुपयांची खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसराफांची नावे समोर येणार५0 हजारांची रोकड जप्त