शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पोलिसांवर दगडफेक करणारे अटकेत; हिंसक आंदोलकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:30 AM

अकोला :  कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर २ जानेवारीच्या रात्री अकोट फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना या पथकावर हल्ला करणार्‍यांना अकोट फैल पोलिसांनी बुधवारी अटक केली. तर, आंदोलनाला हिंसक वळण देणार्‍यांवर खदान पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर २ जानेवारीच्या रात्री अकोट फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना या पथकावर हल्ला करणार्‍यांना अकोट फैल पोलिसांनी बुधवारी अटक केली. तर, आंदोलनाला हिंसक वळण देणार्‍यांवर खदान पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.अकोट फैल पोलिसाचे एमएच - ३0 - एच - ४0९ क्रमांकाचे वाहन मंगळवारी रात्री घुसर परिसरात गस्त घालीत होते. यावेळी घुसर येथील रहिवासी किशोर भास्कर इंगळे (३४), चंद्रशेखर संजय वानखडे (२२) या दोघांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करीत हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजीव राऊतसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर सदर दोन आरोपींचा शोध घेण्यात आला. या दोघांनीच दगडफेक केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर अकोट फैल पोलिसांनी पोलीस कर्मचारी केशव सीताराम बुरंगे यांच्या तक्रारीवरून सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हिंसक आंदोलकांवर गुन्हा दाखलकोरगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद आंदोलनाला हिंसक वळण देणार्‍यांवर खदान पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनांची तोडफोड करणे, प्रतिष्ठानांवर दगडफेक करणे, पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण देणार्‍या हिंसक आंदोलकांवर खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सीसी टीव्ही फुटेज घेण्यात आले असून, यामध्ये अनेक आंदोलकांची ओळख पटली असून, काही आंदोलक पोलिसांच्या कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. त्यामुळे  या प्रकरणी खदान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १४३ गैरकायदेशीर मंडळी जमविणे , १४५ पोलिसांच्या आवाहनाला बगल देणे, १४७ दंगल घडविणे, १४९ दंगल घडविण्यात सहभागी असणे, ४२७ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, तसेच कलम ३ व ४ सार्वजनिक मालमत्ता नासधूस करणे आाणि कलम १३५ मुंबई पोलीस कायद्याचे उल्लंघन करणे, हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkot Failअकोट फैलPoliceपोलिसKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनArrestअटक