लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पुणे ते नागपूर एसटी बसमध्ये बाळापूरचे प्रवासी बसले होते मात्र बाळापूर हा थांबा नसल्याने चालकाने ही बस बाळापूरला थांबविली नाही त्यामुळे सदर बस थेट अकोल्यात आणल्यानंतरही प्रवासी बसमधून न उतरल्याने एसटी बस चालकाने प्रवाशांसह ही बस सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात आणल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. या प्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रवासी बसमधून उतरण्यास तयार नव्हते.पुणे येथून अकोला मार्गे नागपूरकडे जाणाºया बसमध्ये बाळापूरचे काही प्रवासी चढले, त्यानंतर बाळापूर येथे बस थांबविण्यासाठी त्यांनी चालक व वाहकाला विनंती केली. मात्र, चालकाने बाळापूरला बस न थांबविल्याने चालक आणि प्रवाश्यांमध्ये वाद झाले, या वादातच चालकाने ही बस थेट अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकावर आणली. मात्र, या ठिकाणीही प्रवासी बसमधून न उतरल्याने संतापलेल्या चालकाने ही बस थेट सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात आणली.पोलिसांनी प्रवाश्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू होता. मात्र, पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सदर बसला रात्री उशिरा सोडण्यात आल्याची माहिती आहे.
प्रवासी न उतरल्याने बस आणली पोलीस ठाण्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:27 AM
अकोला : पुणे ते नागपूर एसटी बसमध्ये बाळापूरचे प्रवासी बसले होते मात्र बाळापूर हा थांबा नसल्याने चालकाने ही बस बाळापूरला थांबविली नाही त्यामुळे सदर बस थेट अकोल्यात आणल्यानंतरही प्रवासी बसमधून न उतरल्याने एसटी बस चालकाने प्रवाशांसह ही बस सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात आणल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला.
ठळक मुद्देपुणे ते नागपूर एसटी बसमध्ये बाळापूरचे प्रवासी बसले होते थांबा नसल्याने चालकाने ही बस बाळापूरला थांबविली नाहीबाळापूरला बस न थांबविल्याने चालक आणि प्रवाश्यांमध्ये वाद