शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मोहल्ला, शांतता समिती होणार पोलीस मित्र समिती!

By admin | Published: July 06, 2017 12:51 AM

आदेशाची अंमलबजावणी नाही : सदस्यांचे व्हेरिफि केशन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्वीच्या मोहल्ला व शांतता समितीचे रूपांतर लवकरच पोलीस मित्र समितीत होणार आहे; मात्र जातीय सलोखा राखणाऱ्या या समिती सदस्यांना मात्र पोलीस व्हेरिफिकेशनच्या चाळणीतून जावे लागणार आहे.जातीय सलोखा राखण्यासाठी पूर्वी मोहल्ला, शांतता आणि समन्वय समितीचे पदाधिकारी पुढाकार घ्यायचे. ही समिती पोलिसांच्या खांद्याला-खांदा लावून काम करीत असे. दंगल असो किंवा धार्मिक उत्सव यामध्ये या पदाधिकाऱ्यांचे मत पोलीस अधिकारी विचारात घेत असत. त्यामुळे या समितीच्या पदाधिकाऱ्यांचे वजन सामाजिकदृष्ट्या महत्वाचे झाले होते; कालांतराने सामाजिक कार्याचा बनाव करून समितीमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश मिळविला. ही बाब पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आली; मात्र आहे तशी समिती कार्यरत राहिली. त्या विसर्जित झाल्या नव्हत्या. दरम्यान, १५ जुलै २०१५ रोजी मोहल्ला आणि शांतता समिती बरखास्त करून या समितीचे रूपांतर पोलीस मित्र समितीत करण्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालयाचे उपसचिव सुनील जयकुमार सोवितकर यांनी बजाविले. या अध्यादेशास आता दोन वर्षे पूर्ण झाले असले, तरी अंमलबजावणी झाली नाही. अकोल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रु जू झालेल्या राकेश कलासागर यांनी आता पुढाकार घेतला आहे. राज्य, जिल्हा, तालुका आणि पोलीस ठाणे स्तरावर पोलीस मित्र समिती नव्याने गठित केली जाणार आहे. त्यात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, वकील, डॉक्टर, पत्रकार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, नगरसेवक, शिक्षक, दुकानदार, उद्योजक यांचा समावेश करण्याचे सूचविलेले आहे. या सदस्यांना मात्र चारित्र्य पडताळणीच्या पोलीस तपासातून जावे लागणार आहे. कंटरपंथी आणि सक्रिय राजकीय कार्यकर्ते या समितीत घेऊ नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहे. धार्मिक सण आणि महोत्सव आता जवळ येत असल्याने या समितीची गरज आहे.पोलीस मित्र संकल्पनेतून आम्ही काहींची निवड केली असून, शहर वाहतूक शाखेच्या कामात त्यांची मदत घेत आहोत. मोहल्ला आणि शांतता समिती बरखास्त करून नव्याने जिल्हा, तालुका पातळीवर पोलीस मित्र समिती गठित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.-राकेश कलासागर, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला.