शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची १४ तासांपेक्षा अधिक डयुटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 10:53 AM

अकोला पोलिसांच्या दैनंदीनीचा आढावा लोकमतने घेतला असता त्यांचे कर्तव्य तब्बल १४ तासांपेक्षा अधिक होत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीवरुन समोर आले आहे.

- सचिन राऊत

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषानुला रोखण्यासाठी केंद्राने केलेले लॉकडाउन आणि राज्य शासनाने लावलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. दिवस रात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या अकोलापोलिसांच्या दैनंदीनीचा आढावा लोकमतने घेतला असता त्यांचे कर्तव्य तब्बल १४ तासांपेक्षा अधिक होत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीवरुन समोर आले आहे.अकोला पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाºयांची डयुटी व दैनंदीनी कशा प्रकारे आहे. याचा आढावा घेतला असता अधिकारी आणि कर्मचारी सकाळी सहा वाजता पोलिस ठाण्यात उपस्थित होतात. हजेरी लावल्यानंतर अधिकारी व कर्मचाºयांचे राष्ट्रगीत आणि गीनती होउन त्यांना दिलेल्या पॉइंटवर ६ वाजुन ३० मीनीटापर्यंत हजर व्हावे लागते. या वेळेपासून अधिकारी ह गस्तीवर असतात तर कर्मचारी रात्री १० वाजेपर्यंत त्याच ठिकाणवर प्रामाणिकपणे डयुटी बजावतात. या दरम्यान दोन वेळ चहा, नाष्टा आणि दोन वेळचे जेवन त्यांना जागेवरच देण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर या सर्व परिस्थीतीची पाहणी करतात. अधिकारी व कर्मचाºयांना जेवन तसेच नाष्टा वेळेत देण्यात येतो की नाही यासह डयुटी कशा प्रकारे सुरु आहे यावर पोलीस अधीक्षकांचे नियंत्रण असते. मात्र सकाळी ६ वाजेपासून कर्तव्यावर हजर असलेल्या आणि रात्री १० वाजेपर्यंत चोखपने डयुटी बजावणाºया या अधिकारी व कर्मचाºयांना कायदा पायदळी तुडविणाºया अकोलेकरांसोबत तुतु मैमै करावे लागत असल्याचे वास्तव आहे. कोणतेही कारण नसतांना खोटे कारण देउन या पालिसांच्या समोरुन दुचाकी व आॅटोसह कारचालक दिवसभर फीरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येत आहे. मात्र या बडयांना रोखण्यासाठी पोलिसांनाही अडचणी येत असल्याचे त्यांनी लोकमतकडे बोलून दाखवले. काही कार सोडण्यासाठी तर चक्क दोन आमदारांनी हस्तक्षेप केल्याचे पोलिसांनी सांगीतले. यावरुन अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी १४ तासांपेक्षा अधिक वेळ कर्तव्य बजावणाºया या पोलिस अधिकारी व कर्मचाºयांप्रती अकोलेकरांना मात्र काहीही देणे नसल्याचे वास्तव आहे. पोलिसांनाही कुटुंबीय आहेत, जरा विचार करादिवस-रात्र रोडवर कर्तव्य बजावणाºया पोलिस अधिकारी व कर्मचाºयांचा शेकडो नागरिकांशी संपर्क येत आहे. अशातच आता वाशिम आणि बुलडाणा येथे कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने अकोल्यातही धोका वाढला आहे. त्यामुळे दिवसभर रोडवर डयुटी दिल्यानंतर रात्री कुटुंबीयांसोबत राहणेही त्यांना धोकादायक आहे. मात्र तरीही हे पोलिस बांधव निष्ठेने डयुटी बजावत असतांना अकोलेकर मात्र या गंभीर समस्येला मस्करीने घेत सर्वानाच धोक्यात घालुन पोलिसांच्या कुटुंबीयांवरही अन्याय करीत असल्याचे ते बोलत आहेत. घरी परतणे मनाला जड जातेएका पोलिस कर्मचाºयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यांची आई आजारी आहे तर त्यांना सहा महिन्यांची एक मुलगी आहे. दोन खोल्यात त्यांचा हा भाडयाचा संसार सुरु असतांना ते दिवसभर डयुटी बजावल्यानंतर रात्री घरी जाणे त्यांच्या मनाला जड जाते. दिवसभर शेकडो जनांच्या संपर्कात आल्यानंतर घरी परतणे म्हणजे कुटुंबीयांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. सहा महिन्याच्या मुलीला ते जवळ घेत नाहीत तर आईसोबत दुरुनच बोलतात. एवढे असले तरीही ते कोेरोनापासून वाचण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतात. मात्र अकोलेकरांनीही विनाकारण बाहेर न येता घरातच राहुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. वाहतुक कर्मचाºयांवर ताण अधिकवाहतुक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ६ वाजता आल्यानंतर जिवनावश्यक वस्तूचे जड वाहने शहरात आणणे आणि त्यानंतर जनता भाजी बाजार येथे डयुटी करणे. हे आटोपल्यानंतर दिवसभर विनाकारण फीरणाºया वाहनचालकांवर कारवाई करून सायंकाळी पुन्हा जनता भाजी बाजार येथे डयुटी बजावण्याचे कार्य वाहतुक पोलिसांना दिले आहे. त्यानंतर पुन्हा रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर फीरणाºया वाहनांवर कारवाई करण्याचे कामकाज वाहतुक पोलिसांचे आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस