शहरात जातीय सलोखा कायम राहावा, शांतता नांदावी, सामाजिक एकोपा कायम राहावा, सर्व धर्मांमध्ये बंधूभाव कायम रहावा आणि पोलिस व जनतेमध्ये सुसंवाद असावा पोलीस विभागाच्या पुढाकाराणे कौमी एकता चषक क्रिकेटचे सामाने खेळविण्यात येत आहे. स्पर्धेत जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस निरीक्षक विलास पाटील, एसएससीचे कर्णधार भरत डिक्कर, रणजी क्रिकेटपटू रवी ठाकूर, मूनकीर खान, जिल्हा परिषद क्रीडा सदस्य जावेद अली, रामदास पेठ एपीआय दत्तात्रय आव्हाळे, मानाचे पीआय संजय खंडारे, आरएसआय विनोद तांबे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत पहिल्या सामन्यात शाखा कर्मचारी संघाने प्रथम फलंदाजी करत ९१ धावांचे आव्हान दिले. या धावांचा पाठलाग करताना मुर्तीजापुर उपविभाग संघ ७५ धावांवर बाद झाला. दुसरा सामना पोलीस मुख्यालय व कार्यालयीन कर्मचारी यांच्यामध्ये खेळविण्यात आला. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी प्रथम फलंदाजी करताना दहा षटकांमध्ये ५७ धावांचे आव्हान उभारले. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ३ षटकात २२ धावा काढल्या. तसेच ३ विकेट मिळविले. ५७ धावांचा पाठलाग करत पोलीस मुख्यालय संघाने ५ षटकांमध्ये १ विकेटच्या बळावर सामन्यावर विजय मिळविला. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नाबाद २२, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे २२ धावांचे योगदान दिले. स्पर्धेकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन सलीम खान, प्रशांत केदारे, स्कोरर अजय पिंपळकर, अंपायर नितीन तेलगोटे, सागर पांडे, बंटी क्षीरसागर, देवा माम्डीवार, तर कॉमेंट्री म्हणून निलेश गाडगे, गोपाल मुकुंदे काम पहात आहेत.
अंतिम सामना उद्या
या स्पर्धेमध्ये शनिवारी जुने शहर पोलीस स्टेशन विरुद्ध बाळापूर उपविभाग, पोलीस मुख्यालय विरुद्ध विशेष शाखा कर्मचारी यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. यामध्ये विजेता संघ अंतिम फेरीत खेळणार आहे. तर रविवारी पत्रकार संघ व पोलिस अधिकारी संघ व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.