- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या संकटामुळे एप्रिल मे महिन्यात होणाºया व कार्यकाळ संपलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आलेल्या असतानाच आता १५ टक्केपोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र या बदल्यांनाही तीन वेळा मुदतवाढ दिल्याने पोलीस अधिकारी आता वर्षाच्या शेवटी होणाºया बदल्यांसाठी अनुत्सुक असल्याची माहिती आहे. पाच सप्टेंबरपर्यंत बदल्यांसाठी मुतदवाढ दिल्याने राज्यातील १ हजार ४०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाºयांचा जीव टांगणीला लागला आहे.राज्यातील १ हजारांपेक्षा अधिक पोलीस अधिकाºयांचा जिल्ह्यात तसेच परिक्षेत्रात कार्यकाळ संपल्याने त्यांच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बदल्या करण्यात येणार होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे सुरुवातीला पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांना एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली. त्यानंतर १५ टक्के अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र बदल्यांची प्रक्रिया करण्याला तीन वेळा मुदतवाढ दिल्याने पोलीस अधिकाºयांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तर आता नवीन वार्षिक बदल्यांना तीन ते चार महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने या बदल्या करण्यातच येऊ नये, अशी मागणीही पोलीस अधिकाºयांकडून करण्यात येत आहे.राज्यस्तरावर बदल्यांची ही प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्त यांना त्यांच्या स्तरावरील पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात येतात.त्यामुळे या सर्व प्रक्रियेला एक ते दीड महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने या बदल्याची प्रक्रिया आता मार्च-एप्रिल २०२१ मध्येच करण्यात याव्यात, अशी मागणीही राज्यातील पोलीस अधिकाºयांकडून जोर धरत आहे.
१५ टक्के अधिकारी बदल्यांसाठी पात्रकोरोनाच्या संकटामुळे १५ टक्केच पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांचा समावेश आहे. या अधिकाºयांच्या बदल्या केल्यास त्यांना नवीन ठिकाणावर रुजू होणे आणि पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा त्या जिल्ह्यात होणाºया बदली प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात त्यांच्या कुटुंबीयांचे व चिमुकल्यांचा विचार करता या बदल्या तीन ते चार महिन्यांसाठी थांबविण्याचीच मागणी होत आहे.
या अधिकाºयांचा बदल्यांना आक्षेप नाहीपोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस अधीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या तर त्यांना एवढ्या अडचणी येणार नाहीत. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांना आक्षेप नसल्याची माहिती आहे.