मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा टी पॉइंट वर असलेल्या वाहतूक नियंत्रण पोलीस चौकी मागील सहा वर्षांपासून बंद असल्याने व वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पोलीस प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण राहवे म्हणून पोलिस चौकी निर्माण करण्यात आली आहे. काही वर्षे चालू असलेली ही पोलिस चौकी अचानक बंद करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेली ही पोलीस चौकी सध्या शोभेची वस्तू बनली आहे. याठिकाणी पोलिस प्रशासनाचे वतीने वाहतूक पोलिसांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. पण ही पोलिस चौकी मागील काही वर्षांपासून बंद असल्याने अपघाताचे घटनेत वाढ झाली आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला यांनी लक्ष देवुन ही हायवे पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे. शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा टी पॉइंट वर पोलीस प्रशासनाच्या वतीने नॅशनल हायवे पोलिस चौकी निर्माण केली होती. परंतु कलांतराने ही पोलीस चौकी काही वर्षांपासून बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावर चालणाऱ्या वाहतूकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अपघाताचे संख्येत वाढ झाली आहे. कदाचित अपघात झाला तर तातडीची मदतही वेळेवर अपघातग्रस्तांना मिळत नाही. सदर चौकी चालू करण्यासाठी पोलिस प्रशासन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. जर ही पोलिस चौकी पुन्हा सुरू केल्यास वाहतुकीवर नियंत्रण राहील व अपघाताचे प्रमाणही कमी होईल. गत काही दिवसांपासून बोरगांव मंजु ते मूर्तिजापुर दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनेक निष्पाप जीवाचे बळी गेले आहेत. अनेक जडवाहनधारक आपली वाहने सुसाट वेगाने चालवितात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अपघाताचे संख्येत वाढ झाली असून अनेक नागरिक या रस्त्यावर अपघाताचे बळी ठरले आहेत. अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाचे राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी तात्काळ सुरू करावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस चौकी सहा वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 6:12 PM