पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे खेल देशपांडे, नर्सिपूर, खेल सटवाजी, खेल कृष्णाजी, उबारखेड, खेल मुकादम, खाकटा, भांबेरी, दापुरा, हनवाडी, उमरी, रौंदळा, थार, मनब्दा, अटकळ, निंबोळी, सांगवी, पारळा, हिलालाबाद, पिवंदल खुर्द, नेर, खापरखेडा या २२ गावांतील नागरिकांना आता पोलीस स्टेशनशी संबंधित दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांच्या व इतर तक्रारी या तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये न येता खेल देशपांडे येथील गणपती मंदिर जवळील पोलीस चौकीतच नोंदविता येतील व त्यावरून कायदेशीर कार्यवाही होईल. या गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी खेल देशपांडे येथील चौकीतच नोंदवाव्यात. सदरचे चौकीमध्ये सहाय्यक फौजदार जांभळे, पोलीस हवालदार अमोल सोळंके, संदीप तांदूळकर व संतोष मेहेंगे असा पूर्णवेळ स्टाफ याठिकाणी नेमण्यात आला आहे. यावेळी नर्सिपूर येथील गब्बर जामदार, तंटामुक्ती अध्यक्ष इनायतउल्ला खान, खेल देशपांडे येथील यासीनभाई सौदागरव गावातील नागरिक उपस्थित होते.
फोटो:
२२ गावांतील नागरिकांनी त्यांच्या पोलीस स्टेशनशी संबंधित तक्रारी या खेलदेशपांडे (पंचगव्हाण) येथील पोलीस चौकीतच नोंदवाव्यात. त्यामुळे तक्रारदाराचा तेल्हारा येण्यासाठीचा त्रास व खर्च वाचणार आहे.
- नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, तेल्हारा