अकोला : गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक सण, उत्सव लक्षात घेता अकोला पोलिसांनी रविवारी पथसंचलन केले. शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले.हे पथसंचलन सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोरील गणेश घाट येथून सुरू करण्यात आले. त्यानंतर सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, दगडी पूल, माळीपुरा, मामा बेकरी, अकोट स्टँड, सुभाष चौक, तेलीपुरा, ताजनापेठ, सराफ बाजार, गांधी चौक, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. या पथसंचलनामध्ये शहर पोलीस उपअधीक्षक कदम, सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्यासह अधिकारी व ४८५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. दंगा काबू नियंत्रणचे २ पथक, ५० गृहरक्षक दलाचे जवान, ४८५ पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांची ८ वाहने या पथसंचलनामध्ये सहभागी करण्यात आली होती.
गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 6:58 PM