ग्रामपंचायतीची सध्या निवडणूक होत आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीला असलेले महत्त्व लक्षात घेता, निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. हातरुण आणि डोंगरगाव येथे पोलिसांनी पथसंचलन केले. हातरुण पोलीस चौकीपासून उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या नेतृत्वात पथसंचलनास सुरुवात झाली. हातरुण येथील मिरवणूक मार्गाने पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात एक अधिकारी, २० कर्मचारी आणि कमांडो सहभागी झाले होते. यावेळी उरळ पाेलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार, धनपाल लाटकर, सुरेश कुंभार, विजय चव्हाण, शैलेश घुगे उपस्थित होते. (फोटो)
------------
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडावे. निवडणुकीच्या काळात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
- अनंतराव वडतकार, ठाणेदार, उरळ