- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गावातील तंटे जास्त वाढू नये तसेच त्यामधील सत्यता जाणून घेण्यासाठी पोलीस पाटील यांच्यावर जास्त विसंबून न राहता ‘गाव तेथे पोलीस कर्मचारी’ हा नवीन प्रयोग जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वातंत्र्यदिनापासून सुरू केला.छोट्या-मोठ्या कारणावरून गावात मोठे वाद होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन मोठे वादंग निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारच्या वादावर आधीच पडदा टाकण्यासाठी तसेच ते तातडीने मिटविण्यासाठी प्रत्येक गावात पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गावांची यादी पडताळणी सुरू केली असून, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या तसेच इतर तपास आणि सर्वच शाखांचे कर्मचारी मिळून याचा ताळमेळ लावण्यात येत आहे. यासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून ‘गाव तेथे पोलीस कर्मचारी’ या उपक्रमास प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमांचाही श्रीगणेशातपासात भर घालण्यासाठी आणखी चार आय बाइक अकोला पोलीस दलात दाखल झाल्या असून, त्या बाइक १५ आॅगस्ट रोजी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेल्या आहेत. आय बाइकला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यासोबतच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दामिनी पथकात आणखी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. याच दामिनी पथकात आणखी एक मोबाइल क्रमांकाचा सामावेश करण्यात आला असून, त्यावर महिला व मुली तातडीने तक्रार करू शकणार आहेत. पोलीस दलात क्यू-आर कोड हादेखील उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांचा गौरवपोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय वासुदेव खडसे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासह पोलीस अधिकाºयांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वातंत्र्यदिनी हे उपक्रम सुरू करून पोलिसांचाही गौरव केला.