समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे (नाशिक), महाराष्ट् अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, राज्य सरचिटणीस प्रा. बबनराव कानकिरड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. संजय तिडके, बुवाबाजी विरोधी अभियान जिल्हा कार्यवाह पी. टी. इंगळे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन याप्रकरणाची ताबडतोब चौकशी व्हावी, सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा व पीडित परिवारास सन्मानाचे जीवन बहाल करण्यासाठी कृती करावी, अशी मागणी केली. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही घटना काळिमा फासणारी आहे. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला. परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने असे प्रकार वाढल्याचे दिसून येत असल्याचे महाराष्ट्र अंनिसने म्हटले आहे. मागील आठवड्यात बार्शीटाकळी येथे असाच सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला गेला आहे.
पोलीसपाटील कुटुंबावर बहिष्कार प्रकरणात गुन्हा दाखल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:17 AM