शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

पोलिसाने आॅटोचालकास बेदम बदडले!

By admin | Published: April 15, 2017 1:36 AM

अकोला: टॉवर चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अ‍ॅटोरिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री टॉवर चौकात घडली.

अकोला: टॉवर चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अ‍ॅटोरिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री टॉवर चौकात घडली. या घटनेमुळे गर्दी जमल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र ज्या पोलिसाने आॅटोचालकास मारहाण केली त्या आॅटोचालकाची तक्रारही न घेता रामदासपेठ पोलिसांनी मारहाण झालेल्या आॅटोचालकासह हा वाद सोडविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.म्हातोडी येथील रहिवासी तथा आॅटोचालक गजानन निरंजन इदोकार हे त्यांचा आॅटो घेऊन जात असताना त्यांना टॉवर चौकात कार्यरत असलेल्या फराज नामक पोलीस कर्मचाऱ्याने अडविले. या दोघांमध्ये प्रवासी वाहतुकीवरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर या दोघांमध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानासमोर हामाणारी झाली असतानाच सदर व्यापारी हा वाद सोडविण्यासाठी गेले. वाद सोडविण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी आला. पोलिसांनी आणि व्यापाऱ्यांनी या दोघांमधील वाद सोडविला; मात्र त्यानंतर फराज नामक पोलीस कर्मचाऱ्याने आॅटोचालकासह दोन व्यापाऱ्यांविरुद्धही तक्रार दिली. त्यामूळे पोलिसांनी आॅटोचालक इदोकार, सागर वानखडे आणि हुंडीवाले या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.चौकातच होते कोंडीशहरातील बहुतांश चौकांमध्ये काही अ‍ॅटोरिक्षा चालकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. टॉवर चौकात नेहमीच अ‍ॅटोचालक बेशिस्तपणे कुठेही, कधीही वाहन उभे करतात. अचानक गती कमी करून प्रवासी बसवतात. अशातच काही अ‍ॅटोरिक्षा चालक वाहतूक नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक करतात.