लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्टेशन चौकात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी विजय ऊर्फ बाबू हिरोळे याला अटक केली होती. त्याला घेऊन रामदासपेठ पोलीस मुंबईला गेले आहेत. त्याने कोकेन कोणाकडून घेतले, याचा शोध पोलीस घेणार आहेत. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल. मुंबई येथून कोकेन आणून अकोल्यात त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुलजापुर्यातील आरोपी विजय ऊर्फ बाबू हिरोळे (१९) याला अटक करून, त्याच्याकडील ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश संतानी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोघांनाही न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. विजय हिरोळे हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला कोकेन देणार्या नायजेरियन जेम्स नावाच्या युवकाचा शोध घेण्यासाठी रामदासपेठ पोलिसांचे पथक त्याला मुंबईत घेऊन गेले आहे. विजय हिरोळेची पोलीस कोठडी शनिवारी संपत असल्याने पोलिसांना त्याला अकोल्यात आणणे शक्य होणार नसल्याने त्याला मुंबई न्यायालयात हजर करण्याची परवानगी अकोला न्यायालयाकडून घेण्यात आली असल्याची माहिती रामदास पेठ पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी दिली. -
पोलीस आरोपीला घेऊन मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:15 AM
रेल्वे स्टेशन चौकात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी विजय ऊर्फ बाबू हिरोळे याला अटक केली होती. त्याला घेऊन रामदासपेठ पोलीस मुंबईला गेले आहेत. त्याने कोकेन कोणाकडून घेतले, याचा शोध पोलीस घेणार आहेत. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल.
ठळक मुद्देकोकेन जप्ती प्रकरण मुंबई न्यायालयात करणार हजर