- सचिन राउत
अकाेला : राज्यातील पाेलीस दलात कार्यरत असलेल्या सुमारे दीड लाख पाेलीस कर्मचाऱ्यांना आतापर्यंत गणवेश साहित्य देण्यात येते हाेते. मात्र, २०२१-२२ या वर्षात पाेलिसांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता म्हणून तब्बल ५ हजार १६७ रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याच्या गृहविभागाने प्रक्रिया पूर्ण केली असून, काेट्ट्यवधी रुपयांच्या रकमेचे नियाेजन संबंधित जिल्हा पाेलीस अधीक्षक, तसेच पाेलीस आयुक्तालय यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यासाठी सुमारे ७१ काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या पाेलीस दलात कार्यरत असलेल्या एक लाख ३७ हजार पाेलीस कर्मचाऱ्यांना गणवेश साहित्य देण्यात येते. मात्र, या वर्षी शासनाने गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता म्हणूण पाच हजार १६७ रुपयांचा निधी थेट पाेलीस कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे नियाेजन केले आहे. यासाठी अर्थ विभागाने ७१ काेटी रुपयांचा निधीही दिला असून, ताे संबंधितांना वाटप करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. या गणवेश भत्त्याचे परिपत्रक गृहखात्याचे अप्पर पाेलीस महासंचालक एस.जगन्नाथ यांनी काढल्याची माहिती आहे. हे परिपत्रक राज्यातील पाेलीस अधीक्षक, पाेलीस आयुक्त यांना पाठविण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा स्तरावरील पाेलिसांच्या संख्येनुसार, हा निधी आता वितरित करण्यात ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात हाेणार आहे.
राज्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख ३७ हजार ४०७
राज्यातील पाेलिसांसाठी भत्ता निधी ७० काेटी ९९ लाख ८१ हजार ९६९ रुपये
ऑगस्ट महिन्यात हाेणार जमा
प्रत्येक पाेलीस कर्मचाऱ्याच्या खात्यात गणवेश भत्त्याची सुमारे पाच हजार १६७ रुपयांची रक्कम ऑगस्ट महिन्यात जमा हाेणार असल्याची माहिती आहे. त्यासाठीचे परिपत्रक अर्थ विभागाने काढले असून, ही प्रक्रिया पूर्ण हाेताच रक्कम खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू हाेणार असल्याची माहिती आहे.
पाेलीस बांधवांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता मिळणार आहे. यासाठी नियाेजन करण्यात आले असून, ही प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरून राबविण्यात येणार आहे. अकाेला जिल्ह्यातील सुमारे दाेन हजार ४०० पाेलीस कर्मचाऱ्यांना या भत्त्याचा लाभ हाेणार आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांना हा भत्ता मिळण्याची शक्यता आहे.
- जी.श्रीधर, पाेलीस अधीक्षक अकाेला.