शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून राजकीय घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:59 AM

अकोला:शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ओळख असणार्‍या महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीवरून भाजपाच्या दोन गटांत चांगलेच घमासान रंगल्याचे चित्र आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणाचे बळी ठरलेल्या आयुक्त लहाने यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागातून जारी न होता महसूल विभागातून निघाल्यामुळे प्रशासकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आयुक्त अजय लहाने यांच्यासारख्या खमक्या अधिकार्‍याची गरज असताना त्यांची बदली होणे कितपत योग्य, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

ठळक मुद्देभाजपातील अंतर्गत राजकारणाचा आयुक्तांना फटकानगरसेवकांची नाराजी कशासाठी?समन्वयाची भूमिका अंगलट

आशिष गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ओळख असणार्‍या महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीवरून भाजपाच्या दोन गटांत चांगलेच घमासान रंगल्याचे चित्र आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणाचे बळी ठरलेल्या आयुक्त लहाने यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागातून जारी न होता महसूल विभागातून निघाल्यामुळे प्रशासकीय वतरुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आयुक्त अजय लहाने यांच्यासारख्या खमक्या अधिकार्‍याची गरज असताना त्यांची बदली होणे कितपत योग्य, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.आज रोजी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. जिल्ह्याची सूत्रे खासदार संजय धोत्रे यांच्याकडे असून, सलग पाचव्यांदा विजयश्री प्राप्त करणारे आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांचा त्यांच्या मतदारसंघापुरताच नव्हे, तर जिल्ह्यात प्रभाव असल्याचे कोणीही नाकारत नाही. या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात महापालिका क्षेत्राचा अंतर्भाव होतो. त्यामुळे साहजिकच शहराच्या विकास कामांसाठी निधी खेचून आणणे आणि त्याद्वारे रखडलेल्या विकास कामांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी दोन्ही आमदार कमालीचे आग्रही असल्याचे दिसून येते. विकास कोणत्याही क्षेत्राचा-भागाचा असो, त्यासाठी निधी खेचून आणणारे जनप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचा आपसातील समन्वय मोलाचा ठरतो. सप्टेंबर २00१ मध्ये स्थापना झालेल्या महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारणार्‍या विविध अधिकार्‍यांच्या कार्यशैलीबद्दल अकोलेकर चांगलेच परिचित आहेत. मनपाची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी बिंदूनामावली, आकृतिबंधाचा विषय हाती घेतला. थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्यासाठी उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले. दुसरीकडे प्रशस्त रस्त्यांचे निर्माण व्हावे, यासाठी रस्त्यालगतची धार्मिक स्थळे हटवली. पाणीपुरवठय़ाची कामे निकाली काढण्यासाठी जलवाहिनीचे जाळे टाकले. घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी १२५ वाहनांची व्यवस्था केली. ही बोटावर मोजता येणारी उदाहरणे असून, आयुक्तांच्या रोखठोक भूमिकेमुळे शहर विकासाची गाडी रुळावर आल्याची वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत केवळ पक्षांतर्गत राजकारणातून त्यांची बदली होणे अकोलेकरांना अपेक्षित नाही. 

नगरसेवकांची नाराजी कशासाठी?प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलल्या जाते. कारणमीमांसा केली असता कागदोपत्री लाखो रुपयांची कामे दाखवून देयक काढण्याचे प्रकार कधीचेच बंद झाले आहेत. असे प्रकार पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकांचे हात शिवशिवत आहेत. त्यासाठी आयुक्तांची बदली अत्यावश्यक झाल्याचे चित्र समोर आले आहे.

समन्वयाची भूमिका अंगलटमनपाची सत्तासूत्रे भाजपाच्या हातामध्ये जाऊन महापौरपदी विजय अग्रवाल विराजमान झाले. महापौर विजय अग्रवाल आणि आयुक्त अजय लहाने यांच्यातील वाढता समन्वय पक्षांतर्गत डोकेदुखी ठरू लागल्याची चर्चा आहे. शिवाय, प्रत्येक ठिकाणी आयुक्तांची चौकस बुद्धी आडवी येत असल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी भाजपानेच पुढाकार घेतला, हे येथे उल्लेखनीय. यामुळे आगामी दिवसांत मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असा मनपाचा कारभार पारदश्री चालेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.