शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सेनेच्या पक्षबांधणीमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 2:07 AM

मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाची रणनीती बदलल्याने अनेकांची कोंडी झाली.

आशिष गावंडे अकोला, दि. १३- अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी पक्षाच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीत फेरबदल केले. शिवसेनेला आलेली मरगळ दूर करून पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खा. सावंत यांनी अचूक निशाणा साधत एका बाणात अनेक ह्यपक्षांह्णची शिकार केली. त्याचा परिणाम स्वकीयांच्या नाराजीपेक्षा इतर राजकीय पक्षांवर अधिक झाला असून सेनेच्या बदलत्या भूमिकेमुळे कमालीची अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे.कधीकाळी राज्यातील ग्रामीण भागावर शिवसेनेची मजबूत पकड होती. त्यावेळी शिवसेना मोठय़ा भावाच्या तर भारतीय जनता पार्टी लहान भावाच्या भूमिकेत होते. २0१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राजकीय पक्षांच्या भूमिकेतही बदल झाला. पुढची वाट सोपी नसल्याचे चित्र व जिल्ह्यासह शहरात शिवसेनेची ढासळलेली तटबंदी मजबूत करावी लागणार, हे लक्षात येताच पक्षश्रेष्ठींनी पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला. पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी जिल्ह्यासह शहर कार्यकारिणीत फेरबदल केले. तसेच पक्षात राहायचे असेल तर गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून कामाला लागण्यासाठी आजी-माजी पदाधिकार्‍यांना कानपिचक्या दिल्या. पक्षातील बदलामुळे स्वकीयांमध्ये काही अंशी नाराजीचा सूर होताच; परंतु त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थता इतर राजकीय पक्षांच्या काही सक्रिय पदाधिकार्‍यांमध्ये पसरल्याचे बोलल्या जात आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत झालेल्या बदलाचे परिणाम इतर राजकीय पक्षांच्या निर्णयप्रक्रियेवर होत असून संबंधित पक्षांनी चांगलाच धसका घेतल्याची चर्चा रंगली आहे. नवनियुक्त जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्ह्याची पुनर्बांंंधणी करण्यासोबतच महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. यासाठी त्यांनी सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर यांच्यात प्रत्येकी दहा-दहा प्रभागांची विभागणी करीत जबाबदारी वाटून दिली आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेतील जुन्या जाणत्या अनुभवी आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे आजपर्यंंंंत इच्छा असूनही पक्षात काम न करू शकणारे प्रामाणिक कार्यकर्ते सरसावल्याचे चित्र आहे. आमदारकीचे स्वप्न भंगलेशिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत बदल झाल्याचा सर्वाधिक परिणाम आमदारकीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांवर झाला आहे. जिल्ह्यात काही ठरावीक विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे. अशा मतदारसंघातून २0१९ मधील संभाव्य निवडणुकीसाठी अनेकांनी आतापासूनच तयारी सुरू केली होती. अशा इच्छुकांचे आमदारकीचे स्वप्न भंगल्याची खमंग चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.गृहीत धरणार्‍यांची कोंडीशिवसेनेची ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ अद्यापही कायम असल्यामुळे जिल्हा परिषद, अकोला पंचायत समितीत सेनेचा प्रभाव आहे. असे असताना जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती असो वा महापालिकेतील राजकीय घडामोडींमध्ये मित्र पक्षांकडून शिवसेनेला परस्पर गृहीत धरले जात होते. आज रोजी पक्षातील बदलामुळे गृहीत धरणार्‍यांची चांगलीच कोंडी झाली आहे.