शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

राजकीय पक्षांचा ‘स्थायी’साठी काथ्याकूट!

By admin | Published: April 15, 2017 1:18 AM

आज भाजप, भारिपची बैठक; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून येणार फॅक्स

अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीसाठी उद्या (शनिवार) मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्थायी’मध्ये नेमके कोण्या नगरसेवकाला पाठवायचे, या मुद्यावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये शुक्रवारी दिवसभर काथ्याकूट सुरू होते. भाजपने शनिवारी सकाळी नऊ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन केले असून, भारिप-बमसंचा निर्णय अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर जाहीर करतील. तर काँग्रेस नगरसेवकांच्या नावावर थेट प्रदेश कार्यालयातून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. महापालिकेत स्थायी समितीचे गठन केले जाणार आहे. मनपात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपचे संख्याबळ ४८ असून, त्यांना अपक्ष नगरसेविका माधुरी मेश्राम यांचा पाठिंबा आहे. भाजपचे संख्याबळ लक्षात घेता ‘स्थायी’साठी दहा नगरसेवकांची निवड केली जाईल. काँग्रेसचे १३ नगरसेवक असून, यामधून दोन नगरसेवकांची वर्णी लागेल. शिवसेनेने अपक्ष नगरसेवक जकाऊल हक यांना सोबत घेऊन आघाडी स्थापन केल्याने सेनेच्या आघाडीचे संख्याबळ नऊ झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसंच्या तीन व एमआयएमच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन आघाडी स्थापन केल्याने राकाँचे संख्याबळदेखील नऊ झाले आहे. शिवसेना व राकाँच्या आघाडीचे संख्याबळ समान झाल्याने दोन्ही आघाडीतून प्रत्येकी दोन नगरसेवकांची वर्णी लागेल. आगामी दिवसांत मनपाला मिळणारा निधी पाहता स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी नगरसेवकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. यांच्या नावावर पक्षात खलबते!‘स्थायी’मध्ये पाठवण्यासाठी भाजपमध्ये सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, बाळ टाले, हरीष आलिमचंदानी, अजय शर्मा, मिलिंद राऊत, संतोष शेगोकार, आशीष पवित्रकार, सुजाता अहिर, अनिता शर्मा, संजय बडोणे, विशाल इंगळे, सुनील क्षीरसागर, रंजना विंचनकर तसेच काँग्रेसमध्ये शाहीन अंजूम मेहबूब खान, जैनबबी शे. इब्राहिम, इरफान अब्दुल रहेमान मोहम्मद, चांदनी शिंदे, सुवर्णरेखा जाधव, अ‍ॅड. इक्बाल सिद्दिकी, अजरा नसरीन मकसूद खान यांच्या नावावर खलबते सुरू आहेत. शिवसेनेत राजेश मिश्रा, मंजूषा शेळके, सपना नवले, गजानन चव्हाण तसेच राकाँच्या आघाडीतून उषा विरक, शीतल रामटेके, अ‍ॅड. धनश्री देव किंवा बबलू जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.