अकोला : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी न होण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी ह्यवेट अँन्ड वॉचह्ण हे धोरण अवलंबिले आहे. भाजप, कॉँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भारिप-बमसंच्या इच्छुक उमेदवारांमध्ये प्रत्येक मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे. राजकीय पक्षाकडून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सामाजिक समीकरण लक्षात घेऊन उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भारिप-बमसंच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर आणि आकोट हे मतदारसंघ आघाडीतील कॉँग्रेसकडे तर मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला आहे. मात्र यंदा राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यात एकूण २८८ जागांपैकी १४४ जागांची मागणी केली आहे; परंतु कॉँग्रेसने निम्या जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये अकोल्यातील पाचही मतदारसंघांचा समावेश होता. या घडामोडीनंतर कॉॅँग्रेसनेही सर्वच जागांसाठी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अकोला पूर्व व आकोट मतदारसंघ शिवसेनेकडे तर अकोला पश्चिम, मूर्तिजापूर आणि बाळापूर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहेत. उपरोक्त घडामोडीचे पडसाद जिल्ह्यातही उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनी कॉँग्रेसच्या वाट्यावर असलेल्या अकोला पश्चिमवर दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या वाट्यावर असलेल्या अकोला पूर्व मतदारसंघावर भाजपमधील काही पदाधिकार्यांनी दावा केला आहे. त्यामुळे चारही पक्षांच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत.
राजकीय पक्षांचे ‘वेट अँन्ड वॉच’ !
By admin | Published: September 14, 2014 1:49 AM