- संतोष येलकर
अकोला: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून राज्यात मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या (बीएलए)च्या नेमणुका करण्यात येणार आहेत. मतदार याद्या शुद्ध करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना ‘बीएलए’ मदत करणार आहेत.मतदार याद्यांमधील त्रुटी, दोषांचे निवारण करून मतदार याद्या शुद्ध करण्यासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) म्हणून नेमणुका करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांनी गत १२ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांना ‘व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंग’द्वारे दिले. त्यानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रनिहाय ‘बीएलए’च्या लवकरच नेमणुका करण्यात येणार आहेत. मतदार याद्या अद्ययावत करण्यासह मतदान प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि ‘व्हीव्ही पॅट’चा वापर यासंदर्भात मतदार जागृतीच्या कामात मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांना (बीएलओ) राजकीय पक्षांमार्फत नेमणुका करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांची (बीएलए) मदत घेण्यात येणार आहे.नेमणुका करण्याच्या जिल्हाध्यक्षांना सूचना!मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या (बीएलए) नेमणुका करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयांच्या जिल्हा निवडणूक विभागामार्फत राष्ट्रीय आणि प्रादेशिक मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांकडून ‘बीएलए’च्या नेमणुका करण्यात येणार आहेत.