शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

लाॅकडाऊन काळातही राजकारण अनलाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:19 AM

अकाेला राजकारण हे प्रवाही अन् सर्वस्पर्शी असते, असे म्हणतात. त्याचे प्रत्यंतर २०२० मध्ये आले. काेराेनाच्या भीतीने संपूर्ण देश ठप्प ...

अकाेला

राजकारण हे प्रवाही अन् सर्वस्पर्शी असते, असे म्हणतात. त्याचे प्रत्यंतर २०२० मध्ये आले. काेराेनाच्या भीतीने संपूर्ण देश ठप्प झाला असतानाही राजकारण मात्र सुरूच हाेते. लाॅकडाऊनच्या उपयुक्ततेची, नियमांची अन् अंमलबजावणीच्या व्यवस्थेचेही राजकारणच झाले; त्याहीपेक्षा राजकारण रंगले ते अनलाॅकच्या प्रक्रियेचे. ते गुऱ्हाळ सरत्या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरूच असून, नव्या वर्षातही कायमच राहील. अकाेल्याचे राजकीय क्षेत्रही याला अपवाद नव्हते. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह लहान-माेठ्या सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न या लाॅकडाऊनमध्ये कायम ठेवला. सरत्या वर्षाचे मूल्यमापन करताना हे वर्ष शिवसेनेसाठी लाभदायी आणि विराेधकांची माेठी स्पेस भरून काढण्याचे श्रेय वंचितच्या खात्यात, असे स्पष्ट चित्र उभे राहते. केंद्रातील अन् महापालिकेतील सत्तेमुळे भाजपची बाेटं अडकली हाेती. दुसरीकडे राष्ट्रवादीला नवा आमदार मिळाला; पण, काँग्रेसलामात्र अजूनही आपण कुठे आहाेत हेच सापडले नसल्याचे वास्तवही सरत्या वर्षात कायम आहे.

भाजप

विराेधाची जबबादारी, पण...

२०१९ मधील सत्तांतरामुळे भाजपकडे विराेधकांची जबाबदारी आली; पण केंद्रातील मंत्रिपद आणी महापालिकेतील सत्ता यामुळे भाजपला विराेधकांची भूमिका आस्तेकदमच निभवावी लागली. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आ. रणधीर सावरकर व महानगर अध्यक्षपदी विजय अग्रवाल यांच्याकडे साेपवून भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले; मात्र महापालिकेत सत्ता सांभाळताना शिवसेना व काँग्रेसने माेठे आव्हान उभे करून ठेवले आहे. आ. सावरकर यांचे न झालेले उपाेषण गाजले व शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळवून देत फलद्रुपही झाले. तर पक्षाकडून आलेल्या आंदाेलनांची औपचारिकता वर्षभरात पार पाडली गेली. भाजपच्या इतर आमदारांची कामगिरी मागील पानावरून पुढे एवढीच सरकली.

वंचित

कक्षा रुंदावल्या

वंचित बहुजन आघाडीने आपल्या चाैकटीतून बाहेर येत सरत्या वर्षात नेतृत्वाच्या कक्षा रुंदावल्या. पंढरपूरचे मंदिर आंदाेलन, राजराजेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन, बिहारच्या निवडणुकीत मित्रपक्षांना मदत, युवा आघाडीकडे लक्ष, प्रत्येक विषयावर मत व्यक्त करतीलच असे प्रवक्ते असा सर्व बदल वंचितने जाणीवपूर्वक केलाच; साेबतच जिल्हा परिषदेवरची सत्ता कायम ठेवत आपली ताकदही कायम ठेवली. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यात स्वत:ला चर्चेत ठेवत विराेधी पक्षांची माेठी स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्वस्पर्शी असे मुद्दे शाेधून लाॅकडाऊनमध्येही राजकारण रंगत ठेवले. सरत्या वर्षात त्यांच्या पक्षाचे दाेन माजी आमदार मात्र पक्ष साेडून गेले. आपणच माेठी केलेली मंडळी आपल्याला का साेडून जातात? याचे मूल्यमापन व चिंतन याही वर्षात वंचितने केल्याचे दिसून आले नाही. हेसुद्धा सातत्यच म्हणावे लागेल.

राष्ट्रवादी

अखेर आमदार मिळालाच!

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत जागांचा टक्का वाढविला. पक्ष संघटना जिल्हाभर कार्यरत ठेवली. पक्षातील इनकमिंग वाढले. दाेन माजी आमदारही पक्षात दाखल झाले. दुसरीकडे विधान परिषदेत आ. अमाेल मिटकरी यांना संधी मिळाली. राष्ट्रवादी महानगर अध्यक्षपदाचे घाेंगडे मात्र भिजतच पडले आहे.

काँग्रेस

शांतता! आम्ही सत्तेत आहाेत

राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेली काँग्रेस अकाेल्यात मात्र शांत आहे. केंद्र सरकारच्या विराेधातील विविध आंदाेलनांचे आले तसे नियाेजन करून त्याची कार्यवाही करण्याची काम काँग्रेसने केले. अजूनही जिल्हा समित्या गठीत झाल्या नाहीत. पालकमंत्र्यांचा साधा कार्यक्रमही काँग्रेसला कळविला जात नाही. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदांसाठी बाशिंग बाधून असलेल्यांना पक्षश्रेष्ठींनी दिलेला थांबा कायमच आहे.

शिवसेना

सबकुछ नितीन देशमुख

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि सत्तेतील आमदार या दाेन्ही जबाबदाऱ्या नितीन देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांनी मिळालेल्या संधीचे साेने करीत सत्ता कशी राबवावी हे दाखवून दिले. पक्षातील अंतर्गत विराेधकांनाही शांत व समान अंतरावर ठेवून त्यांनी सेनेवर एकहाती पकड निर्माण केलीच; मात्र भाजपला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडलेली नाही. बाळापूर मतदारसंघ हा त्यांचा एकमेव अजेंडा असणे स्वाभाविकच आहे पण जिल्हाप्रमुख म्हणून इतर तालुक्यांना कमी संधी देणे भविष्यात अडचणीचे ठरण्याची पेरणीही याच सरत्या वर्षात झाली आहे हे मान्य करावे लागेल.

पालकमंत्री आहेत, पण पालकत्वाचे काय?

अकाेल्याला आयात पालकमंत्री मिळाले असले तरी बच्चू भाऊ यांची शैली अन् सामाजिक भान लक्षात घेता त्यांच्याकडून अकाेलेकरांना माेठ्या अपेक्षा हाेत्या. मात्र बच्चू भाऊ यांचा जीव त्यांच्याच मतदारसंघात अन् फारफार तर अकाेटातच अडकल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी आवाहन केलेला जनता कर्फ्यू त्यांनाच मागे घ्यावा लागला. पालकमंत्री म्हणून त्यांनी निराधार, अनाथ व अपंगांसाठीच्या याेजनांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली तरी प्रशासकीय पकड अन् नेतृत्वाचा धाक तयार करून प्रहार करताना ते फारसे दिसले नाहीत.

काळाच्या पडद्याआड

माजी आमदार डाॅ. जगन्नाथ ढाेणे

दादाराव मते पाटील

रमेश मामा म्हैसने

नगरसेवक ॲड. धनश्री देव

संताेष शेगाेकार नंदा पाटील