अकोला: मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपाच्या जलप्रदाय विभागाने महान धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असून, तो अशुद्ध नसल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून होत आहे. धरणात पुरेसा जलसाठा असताना महापालिकेने पाचवा व्हॉल्व्ह नेमक ा कशासाठी उघडला आणि याच वर्षी पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा कसा, असे नानाविध प्रश्न उपस्थित होऊन महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावरील प्रक्रियेबद्दल शंका निर्माण केली जात आहे.आज रोजी महान धरणात २२.१ इतका जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणातील जलसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा परिणाम उपलब्ध जलसाठ्यावर होईल, हे निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून अकोलेकरांना पाणी पुरवठा करताना मनपाच्या जलप्रदाय विभागाला कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत शहरवासीयांना दर दोन तसेच काही भागातील नागरिकांना तीन दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. सध्याचे चित्र पाहता नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत असला, तरी मागील काही दिवसांपासून शहरवासीयांना पिवळसर रंगाचा गढूळ पाणी पुरवठा होत आहे. या पाण्याचा नाइलाजाने पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पदाधिकारी व्यस्त; अकोलेकर त्रस्तमागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात नागरिक सातत्याने ओरड करीत असले तरी त्यांचा आवाज ऐकून घेणारे महापालिकेतील पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तूर्तास तरी अकोलेकरांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
पाचवा व्हॉल्व्ह याच वर्षी उघडला का?धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे पिवळसर रंगाचा पाणी पुरवठा होत असल्याचे मनपाकडून स्पष्ट केल्या जात आहे. आजवरचा अनुभव लक्षात घेता धरणातील जलसाठ्याने तळ गाठल्यानंतर पाचवा व्हॉल्व्ह उघडला जातो. अद्याप तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. असो, पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यानंतरही अकोलेकरांना इतक्या दिवसपर्यंत गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने मनपा प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.आयुक्त साहेब समस्या मार्गी लावा!गढूळ पाणी पुरवठ्यामुळे अकोलेकरांमध्ये घबराट पसरली आहे. पिवळ्या रंगाचे पाणी अशुद्ध नसल्याचा दावा करणाºया प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. या प्रकाराची दखल महापालिका आयुक्त संजय कापडणीस घेतील क ा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.