शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

अल्प वेळात माऊंट मेन्थो शिखर गाठणारी पूजा

By admin | Published: September 25, 2014 2:47 AM

अकोला येथील पूजा जंगमहीने ६,४४३ मीटर उंचीवरील माऊंट मेन्थो शिखर सर केले.

अकोला : हिमालयीन गिर्यारोहण एक अवघड साहस आहे. हे साहस करताना हिंमत, धैर्य सोबतच आत्मविश्‍वास लागतो. या गुणांच्या बळावरच अकोल्याच्या पूजा जंगमने माऊंट मेन्थो हे हिमालयीन शिखर सर केले. विशेष म्हणजे पूजाने सर्वात कमी वेळात ही मोहीम पूर्ण करून एक विक्रम स्थापित केला व स्त्रीचे अस्तित्व केवळ चूल आणि मुलापुरते नसून, मनात आणले तर ती अशक्यप्राय गोष्टदेखील आवाक्यात आणू शकते, हे दाखवून दिले आहे. दिल्ली येथील इंडियन माऊंटरिंग फाऊंडेशन या इंडियन आर्मीच्या संचालनात चालविल्या जाणार्‍या संस्थेच्या माध्यमातून विविध गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन करण्यात येते. या मोहिमेत देशभरातील गिर्यारोहक सहभागी होतात. यावर्षी या मोहिमेत अकोल्याची पूजा जंगम ही युवती सहभागी झाली होती. तिने समुद्रसपाटीपासून ६,४४३ मीटर उंच असलेल्या हिमालयातील माऊंट मेन्थो शिखर सर करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे फक्त मुलींच्याच असलेल्या या मोहिमेत पश्‍चिम भारतातून पूजा ही एकमेव आहे. पूजाने २00६ पासून गिर्यारोहणाच्या क्षेत्रात रुची घेतली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेताना तिने क्लम्बिंग स्पोर्टस या प्रकारात जाण्याचे ठरविले. यासाठी तिने अजिंक्य साहसी संघाचे धनंजय भगत यांच्याशी संपर्क साधला. भगत यांनी पूजाला मार्गदर्शन केले. येथून पुढे तिचा गिर्यारोहणात सहभाग वाढत गेला. २00६ मध्ये पूजा राजस्थानमधील सिक्कर येथे क्लम्बिंग स्पोर्टस स्पर्धेसाठी गेली. या स्पर्धेत तिने अंतिम फेरीत धडक मारली होती. पूजाने २00७ मध्ये गिर्यारोहणाचे अधिक प्रशिक्षण घेण्यासाठी बेस कोर्ससाठी उत्तर काशी येथील संस्थेत प्रवेश घेतला. येथे तिने ए ग्रेड मिळविला. २0१0 मध्ये तिने अँडव्हान्स कोर्सदेखील ह्यएह्ण ग्रेड मध्ये पूर्ण केला. २0११ मध्ये पूजाने दिल्ली येथील इंडियन माऊंटरिंग फाऊंडेशनच्यावतीने आयोजित भारतीखुंटा येथील मोहिमेत प्रथम सहभाग घेतला होता.