सध्या अकोला-वाशिम महामार्गाचे काम माँटेकार्लो कंपनीद्वारे सुरू आहे.या कंपनीचा कॅम्प पातूर तालुक्यातील भंडारज बु. शिवारात आहे. याठिकाणी हॉट मिक्स, गिट्टी क्रशर व मुरमाची खदान असून त्याची अवजड वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे दोन वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केलेल्या भंडारज रस्त्याची वाट लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बाभुळगाव- माझोड- गोरेगाव -अकोला रस्ता खराब झाल्यामुळे पातूर तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर भंडारजमार्गे अकोल्यास सुरू आहे.
पण, आता भंडारज रस्ता सुद्धा माँटेकार्लो कंपनीच्या अवजड वाहनामुळे खराब झाल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने माँटेकार्लो कंपनीकडून भंडारज रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपचे माजी सभापती अनंत ऊर्फ बालू बगाडे, प्रवीण देशपांडे, पातूरच्या माजी नगराध्यक्षा मीरा तायडे, नाना अमानकर, आत्मा समितीचे अध्यक्ष श्रीकांत बराटे, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष पुंडलिक आखरे, गजानन शेंडे, अजय लांडे, यशवंतराव देशमुख, मिठाराम नाकट, सूर्यकांत जोशी, मंगेश गाडगे, पांडुरंग राऊत, दत्ता बर्डे, संतोष गव्हाळे, प्रमोद जैन, छोटुबाप्पू देशमुख, शिवलाल नाकट, संदीप ढोरे, महेश गावंडे, सुदामा कौलकार, मार्तंडराव मोकळकार यांनी केली आहे.
फोटो:
170921\img-20210917-wa0314.jpg
रस्ता