मुंडगाव-सिरसोलीमार्गे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरूच असते. याच मार्गाने अनेक भाविक संत गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मुंडगावला येतात. रस्ता खड्डेमय झाल्याने भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र काही दिवसांतच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
--------------------
अपघाताची शक्यता वाढली
संत गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात. त्यामुळे मुंडगाव-सिरसोली मार्गावर नेहमीच वर्दळ असते. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. गत काही दिवसांत खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
---------
मुंडगाव परिसरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, संत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंडगावात अनेक भाविक येतात. त्यामुळे या परिसरातील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी.
-विजय ढोरे,
गजानन महाराज पादुका संस्थान विश्वस्त, मुंडगाव