मूर्तिजापूर : मूर्तिजापूर - शेरवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याचे वीस वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते, तेव्हापासून रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मूर्तिजापूर शहरानजीक असलेल्या शेरवाडी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गत वीस वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. तेव्हापासून अद्यापही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गाने विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू राहते. तसेच मूर्तिजापूर शहरातील शहरवासीय सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी याच रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने रस्त्यावर गर्दी असते. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही शेरवाडीवासीयांनी दिला आहे. (फोटो)
--------------------
वीस वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. या रस्त्याने रहदारी असल्याने त्वरित दुरुस्ती करावी, याबाबत अनेकदा निवेदन देऊनही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. आताही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करू.
-अमोल दिनकर ढाकरे, शेरवाडी
----------------------------
मूर्तिजापूर-शेरवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वरिष्ठांना प्रस्ताव पाठविण्यात आला असून, निधी उपलब्ध होताच रस्त्याच्या दुरुस्तीेचे काम सुरू करण्यात येईल.
-के. डी. ठाकरे, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, मूर्तिजापूर