हातरुण : कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दिसून येते. परिसरातील रस्त्यांची चाळणी झाली असून, अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हातरुण, मालवाडा, शिंगोली, दुधाळा, लोणाग्रा परिसरातील ग्रामस्थांना शिक्षण, दवाखाना, बाजारपेठ, कार्यालयीन कामकाजासाठी हातरुण, अकोला आणि बाळापूर जावे लागते. हातरुण-बोरगाव वैराळे, हातरुण-लोणाग्रा, हातरुण-निमकर्दा, हातरुण-लोणाग्रा फाटा या रस्त्यांची दुर्दशा झाली असून, रस्त्यांवरून वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मालवाडा-लोणाग्रा फाटा रस्त्यावर खड्डे कायम असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. हातरुण परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिकांना खड्ड्यातून जावे लागते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तरीही संबंधित विभागाच्या दुर्लक्षतेमुळे परिस्थिती जैसे थे आहे. वाहनचालकांना पाठ व मणक्यांचे आजार वाढले आहेत. तसेच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)
---------------------
निमकर्दा, हातरुण, लोणाग्रा फाटा, बोरगाव वैराळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरण न केल्यास मार्गातील आंदोलन करण्यात येईल.
- राम गव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य.
-------------------
काटेरी झुडपांमुळे अपघाताची शक्यता!
हातरुण परिसरातील रस्त्यांंच्या दुतर्फा बाजूने काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.