शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

खिचडीसाठी गॅस कनेक्शनची सक्ती!

By admin | Published: November 27, 2015 1:41 AM

गॅस कनेक्शनवरून उडणार भडका : निधीची तरतूद नाही.

सिद्धार्थ आराख /बुलडाणा : विद्यार्थ्यांंना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांना सकस व पोषण आहार मिळावा, याकरिता शासनाने माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. आता हे माध्यान्ह भोजन शिजविण्यासाठी शासनाने गॅस कनेक्शन सक्तीचे केल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. या गॅस कनेक्शनचा खर्च करायचा कोणी, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे. राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मधल्या सुटीत मुलांना खिचडी शिजवून देण्याचा शासनाचा निर्णय आहे; मात्र या माध्यान्ह भोजनासाठी खिचडी शिजवून देताना चुलीऐवजी गॅस कनेक्शन घ्यावे, असा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढला आहे. ३0 नोव्हेंबरपर्यंत या गॅसची सोय करावी, असे आदेश सर्वच शाळांना देण्यात आल्याने शिक्षक धास्तावले आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित एकूण २ हजार ८६२ शाळा या शालेय पोषण आहारास पात्र असून, विद्यार्थी संख्या ३ लाख ११ हजार ३७४ एवढी आहे. यामध्ये प्राथमिक गटामध्ये १ ते ५ वी पर्यंंत शाळांची संख्या १ हजार ८६९ असून, विद्यार्थी संख्या १ लाख ८८ हजार १४८ आहे., तर प्राथमिक गटात इयत्ता ६ वी ते ८ वीपयर्ंत शाळांची संख्या ९९४ एवढी असून, विद्यार्थी संख्या १ लाख २३ हजार २२६ एवढी आहे. या विद्यार्थ्यांंना मध्यल्या सुटीत खिचडी शिजवून दिली जाते. यात प्राथमिक गटातील १00 ग्रॅम तर माध्यमिक गटातून १५0 ग्रॅम शालेय पोषण आहार पुरविला जातो. जिल्हा परिषदेच्या जवळपास ७५ शाळांमध्ये सद्यस्थितीत गॅस कनेक्शन आहेत. उर्वरित शाळांमध्ये चुलीवरच खिचडी शिजविल्या जाते. विशेष म्हणजे हे गॅस कनेक्शन घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारचे अनुदान संबंधित शाळांना दिले नाही. शाळांनी स्वत:च्या खर्चाने गॅस कनेक्शन विकत घेतले आहे. इतर शाळांजवळ मात्र स्वत:चे गॅस कनेक्शन नाही. आता सर्वच शाळांनी गॅस कनेक्शन विकत घ्यावे, असा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे.; मात्र हे गॅस कनेक्शन खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद काय, हे अद्याप स्पष्ट केले नाही. एका गॅस जोडणीसाठी ३ ते ४ हजार रुपये खर्च येतो. नव्या कनेक्शनसाठी हा खर्च कोण करणार, यावरून आता शिक्षण विभागात संभ्रम आहे. शालेय पोषण आहारास पात्र शाळांची संख्या दोन हजार ८६२ एवढी आहे. एका गॅस कनेक्शनचा खर्च ३ ते ४ हजार रुपये येतो. म्हणजे जिल्ह्यातील दोन हजार ८६२ शाळांच्या गॅस कनेक्शनचा खर्च कोट्यवधी रुपयाच्या घरात जाणार आहे. हा खर्च कसा करायचा, हा पेच शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे.