अकोला, दि. १४- सुधीर कॉलनीलगतच्या संताजी नगरमध्ये खुल्या जागेवर उभारलेले पक्के अतिक्रमण शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धाराशायी केले. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी आ. रणधीर सावरकर यांच्याकडे धाव घेऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. आ. सावरकर यांच्या सूचनेवरून मनपाने तडकाफडकी कारवाई केली.संताजी नगरमध्ये खुल्या जागेवर नारायण सोनोने यांनी पक्के अतिक्रमण उभारले होते. त्यामुळे परिसरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावताना अडथळा निर्माण झाला होता नागरीकांच्या तक्रारीवरून या जागेची आ. सावरकर यांनी प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर मनपा प्रशासनाला अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते.
खुल्या जागेवरील पक्के अतिक्रमण धाराशायी
By admin | Published: October 15, 2016 2:59 AM