शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गरिबांना एक रुपयात मिळणार एक किलो ज्वारी, मका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:14 AM

गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ रुपया किलो दराने १ किलो मका व ज्वारी वितरित करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील मका व ज्वारी खरेदी करण्यात आली असून, शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ रुपया किलो दराने १ किलो मका व ज्वारी वितरित करण्यात येणार आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनामार्फत २०२०-२१ या वर्र्षीच्या रब्बी हंगामातील ज्वारी व मका राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला. त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकºयांकडून १७ रुपये ६० पैसे प्रती किलो दराने मका व २५ रुपये ५० पैसे प्रती किलो दराने ज्वारी खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ज्वारी व मका इत्यादी भरड धान्य खरेदीची मुदत१५ जुलै रोजी संपुष्टात आली.त्यानुषंगाने राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये मका व ज्वारी इत्यादी भरड धान्याची खरेदी करण्यात आली, त्याच जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या ज्वारी व मका या भरड धान्याचे वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना आॅगस्टपासून करण्याचा आदेश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २२ जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा पुरवठा अधिकाºयांना देण्यात आला आहे.त्यानुसार राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ रुपये किलो दराने १ किलो मका किंवा ज्वारी वितरित करण्यात येणार आहे.

वितरणात हलगर्जी केल्यास शिस्तभंगाची कारवाई!ज्वारी व मका इत्यादी भरड धान्याचे वितरण आॅगस्टमध्ये प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना करावयाचे आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत भरड धान्य वाटपाची कार्यवाही पूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना देत, यासंदर्भात हलगर्जी झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आला आहे.

शासनाच्या आदेशानुसार आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकºयांकडून खरेदी करण्यात आलेला मका जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रती किलो १ रुपया दराने वितरित करण्यात येणार आहे. भारतीय खाद्य निगमच्या गुणवत्ता नियंत्रक कक्षाकडून चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आॅगस्टमध्ये शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी १ किलो मका वितरित करण्यात येणार आहे.-बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना