लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिलांची टोळी संशयीरीत्या फिरत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी रात्री या महिलांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. खदान पोलिसांनी या महिलांची चौकशी सुरू केली आहे.खदान व सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाढत्या चोरींच्या व चेन स्नॅचिंगच्या घटना लक्षात घेता खदान पोलिसांनी संशयितांवर वॉच ठेवणे सुरू केले आहे. शहरात वाढत्या गुन्ह्यांचा आलेख लक्षात घेता पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनीही सतत क्राइम मिटिंगमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहे त. शहरातील कुठल्याही परिसरात संशयित व्यक्ती फिरत असतील तर पोलीस नियंत्रण कक्षाला किंवा संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने खदान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयास्पदरीत्या फिरणार्या महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दा खल करण्यात आला आहे.
अकोल्यात संशयास्पद स्थितीत फिरणार्या महिला पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 2:09 AM
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिलांची टोळी संशयीरीत्या फिरत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी रात्री या महिलांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. खदान पोलिसांनी या महिलांची चौकशी सुरू केली आहे.
ठळक मुद्देमहिलांची टोळी संशयीरीत्या फिरत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली होती माहितीवरून पोलिसांनी बुधवारी रात्री या महिलांच्या टोळीला ताब्यात घेतले