या लोखंडी विद्युत खांबामध्ये कधीकधी विद्युत प्रवाह असतेा, सदर विद्युत खांब रस्त्याच्या बाजूला असल्याने ये-जा करणाऱ्या वृद्ध तसेच रस्त्यावर खेळणारे चिमुकले या खांबाला हात लावतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी साचल्याने विद्युत खंबामध्ये विद्युत प्रवाह येत असल्याने जनावरांना वीजेचा धक्का लागून दगावल्याच्या तसेच जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ तसेच पशुपालकांनी सस्ती वीज उपकेंद्राकडे वारंवार तक्रार केली. परंतु ग्रामस्थांच्या तक्रारीकडे महावितरण विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप होत आहे.
गाय दगावल्याची आर्थिक भरपाई मिळेना
पिंपळखुटा येथील महेंद्र सदाशिव वानखडे, या पशुपालकांची पंधरा हजार किमतीची गाय या लोखंडी विद्युत खांबातील विजेच्या प्रवाहाचा धक्का लागून गाय दगावल्याची घटना ६ ऑक्टोंबर २०२० रोजी घडली होती. परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही गाय दगावल्याची आर्थिक भरपाई मिळाली नाही. लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून जनावरे दगावली. तसेच अनेक जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. तरीही महावितरण विभागाला जाग आली नसून, अजून किती जनावरांचे बळीची आवश्यकता आहे. असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.