शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता!

By admin | Published: August 11, 2015 10:39 PM

विदर्भात अहेरीला ५ से.मी. तर वाशिमला १ से.मी. पावसाची नोंद.

अकोला : येत्या ४८ तासात कोकण-गोवासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यात पावसाच्या पुनरागमनानंतर अधून-मधून तुरळक ठिकाणी पाऊस येत आहे; परंतु पश्‍चिम विदर्भातील पावसाचा जोर ओसरला आहे.सध्या उत्तर प्रदेशच्या उत्तर-दक्षिण ओडिशाच्या किनार्‍यालगत असलेल्या पश्‍चिम-मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मागील चोवीस तासात विदर्भातील अहेरी येथे ५ से.मी., धामणगाव, सडकअर्जुनी, सालेकसा, झरीजामणी येथे प्रत्येकी ३ से.मी., आमगाव, भिवापूर, चांदूर, चिखलदरा, धारणी, हिंगणा,कोपणी, पेरसेवणी, सावनेर व वाशिम येथे प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरील कोयना नवजा येथे २ से.मी., अम्बोणे, डुगरवाडी, कोयना पोफळी, ताम्हिणी व धारावी येथे प्रत्येकी १ से.मी. पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील गिरणा धरण येथे ४ से.मी. राहुरी, चांदवड, गगनबावडा, महाबळेश्‍वर, नांदगाव व मोहोळ येथे प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात मुखेड येथे ४ से.मी. चाकुर, खुलताबाद, माजलगाव ३ से.मी.,अहमदपूर,अंबड, धनसांगवी, तुळजापूर, २ से.मी.,अंबेजोगाई, बीड, गेवराई,जालना, कन्नड, किनवट, परतूर, रेणापूर, सेनगाव, उमरगा, वैजापूर या ठिकाणी प्रत्येकी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. येत्या १२ व १३ ऑगस्टपर्यंत कोकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, १४ व १५ ऑगस्ट रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १२ ते १७ ऑगस्टपर्यंत पुणे व परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई व परिसरात १२ व १३ ऑगस्ट रोजी पावसाच्या सरी कोसळतील.