अकोला : राज्यात येत्या ३६ तासांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील चोवीस तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर विदर्भातील भामरागड येथे ५ से.मी. तसेच आकोट, कामठी व खारंधा येथे ४ से.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. राजस्थानच्या आणखी काही भागामधून व पंजाब आणि हरयाणाच्या काही भागामधून परतलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाची सीमा कायम आहे. मागील चोवीस तासांत बुधवार सकाळी ८.३0 वाजेपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. दरम्यान, १0 ते १३ सप्टेंबरपर्यंत कोकण-गोवा बर्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुणे व आसपासच्या परिसरात १0 ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. १0 व ११ सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
राज्यात तुरळक पावसाची शक्यता
By admin | Published: September 10, 2015 1:51 AM