अकोला: राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांचा बेमुदत संप सुरू असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि केंद्र चालकाचे टास्क कन्फर्मेशनचे (विविध कामे, प्रमाणपत्रे) काम ग्रामसेवकांच्या लॉगिनमधून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार घडल्यास संबंधित केंद्र चालकावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने विविध मागण्यांसाठी राज्यभरात एकाच वेळी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. समान काम-समान दाम, समकक्ष पदे-समान वेतनश्रेणी, ग्रामसेवकाच्या शैक्षणिक अर्हता बदल करणे, लोकसंख्या आधारित ग्रामविकास अधिकारी पदांत वाढ करणे, वेतनत्रुटी दूर करणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ देणे, अतिरिक्त कामे कमी करणे, या मागण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनादरम्यान ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या कर्मचारी आणि संगणक सुविधा केंद्र चालकांच्या कामाबाबतचे लॉगिन ग्रामसेवकांच्या नावे आहे. कर्मचाºयाचे वेतन काढणे, तसेच संगणक सुविधा केंद्रातून दिल्या जाणाºया विविध कागदपत्रे, सेवा, सुविधांचे टास्क कन्फर्मेशनचे लॉगिन-पासवर्ड ग्रामसेवकांच्या नावे असताना ते केंद्रचालकाकडूनच वापरले जाऊ शकते. ग्रामसेवकांचा संप सुरू असताना ते कोणतेही कागदपत्र किंवा सेवा देत नसताना त्यांच्या लॉगिन-पासवर्ड वरून ही कामे संगणक केंद्र चालक करू शकतात. तसे केल्यास ग्रामसेवकांच्या लॉगिनचा दुरुपयोग होणार आहे. तो प्रकार रोखावा, तसेच काहींना ग्रामसेवकांच्या लॉगिन-पासवर्डचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला.
ग्रामसेवकांच्या ‘लॉग इन’चा दुरुपयोग होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:15 PM