बार्शिटाकळी : बार्शिटाकळी उपकेंद्रांतर्गत कार्यालयातील अभियंत्याचे पद गत दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने विद्युत ग्राहकांमध्ये असंतोष भडकला आहे.बार्शिटाकळी विद्युत उपकेंद्रांतर्गत १५ गावे असून, या कार्यालयात गत दोन महिन्यांपासून अभियंता नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कार्यालयाचा उपअभियंता दोन महिन्यांपूर्वी निलंबित झाल्यापासून, कार्यालयाचा कारभार हवेवर सुरू आहे. गत १५ दिवसांपासून या केंद्रांतर्गत असलेल्या गावांचा विद्युत पुरवठा रामभरोसे असून, दररोज सहा ते सात तास, तर कधी रात्रभर विद्युत पुरवठा बंद राहतो. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ग्राहक विद्युत कार्यालयात जातात तेव्हा त्यांना तेथे भलेमोठे कुलूप लावलेले दिसते. कार्यालयात पुरेसे लाईनमन नाहीत. त्यामुळे विद्युत समस्यांचे निराकरण होत नाही. पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकर्यांनी बागायती पिकांची लागवड केली आहे; परंतु विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे सिंचन बाधित होत आहे. त्यामुळे पिके सुकत असल्याचे चित्र आहे.
विद्युत अभियंत्याचे पद दोन महिन्यांपासून रिक्त
By admin | Published: June 27, 2014 9:20 PM