राम देशपांडे/अकोला ऑनलाईन खरेदी-विक्री करणार्या ग्राहकांच्या संख्येत अलिकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. ऑनलाईन मार्केटिंगमुळे संबंधित कंपन्यांसोबतच टपाल खात्यालाही फायदा होत असून, पोस्टाच्या ग्राहक संख्येत वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे.ऑनलाईन विक्रीच्या व्यवसायात नामांकित कंपन्या उतरल्या असून, विश्वसनियता, गुणवत्ता आणि वाजवी किंमतीमुळे ऑनलाईन खरेदी करणार्या ग्राहकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. डिसेंबर २0१३ पासून कंपन्यांनी ह्यकॅश ऑन डिलिव्हरीह्ण चा (घरपोच वस्तु मिळाल्यानंतर किंमत अदा करणे) पर्याय खुला केल्याने ग्राहकांची संख्या आणखी वाढली. ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचविण्यासाठी ऑनलाईन रिटेल कपन्यांकडून खासगी कुरिअर कंपन्यांसोबतच टपाल खात्याचाही वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे पोस्टाच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती वरिष्ठ डाक अधिकार्यांनी दिली. ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे डाक विभागाला नेमका किती फायदा झाला, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली, तरी अलिकडच्या काळात खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पोस्टाने पाठविण्यात येणार्या पार्सल्सची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास येत असल्याचे या अधिकार्यांनी सांगितले. खासगी कंपन्यांच्या कुरिअर सर्व्हिसमुळे पोस्टामार्फत पाठविल्या जाणार्या पार्सल्सची संख्या मध्यंतरी रोडावली होती; मात्र ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवसायामुळे पोस्टाला पुन्हा ह्यअच्छे दिनह्ण येऊ लागले आहेत. खासगी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातूनही कंपन्या आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पाठवितात; मात्र, देशात जवळपास दीड लाख पोस्ट ऑफिसेसचे जाळे, अगदी गाव पातळीवर असलेली यंत्रणा आणि विश्वासार्हता लक्षात घेता, पोस्टाला प्राधान्य दिले जात वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे. ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या फॅडमुळे अधिकाधिक ग्राहक टपाल खात्याशी जोडले जात आहेत. हिच परिस्थिती राहीली तर, भविष्यात पोस्टाचा कायापालट होईल आणि वाढत्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफीसेसमध्ये ह्यकिऑक्सह्ण (काऊंटर) उभारावे लागतील, असा विश्वास डाक अधिकार्यांनी व्यक्त केला.
ऑनलाईन खरेदीमुळे पोस्टाच्या नफ्यात वाढ
By admin | Published: December 05, 2014 12:03 AM