अकोला : भारतीय डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श योजनेंतर्गत ४० गुणवंत विद्यार्थ्यां दरवर्षी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.
अकोला मुख्यालय पोस्टल विभागाचे प्रवरडाक अधीक्षक संजय आखाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची फिलाटली (टपाल तिकिटांचे संकलन किंवा अभ्यास) कडे वाढलेली आवड लक्षात घेऊन विभागाने ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. यामध्ये प्रादेशिक स्तरावर ४० उत्कृष्ठ नोंदींना शिष्यवृत्ती दिली जाईल.
इयत्ता ६ ते ९ मधील चार श्रेणींमध्ये प्रत्येकी दहा अर्जदाराने अर्ज करणारा विद्यार्थी आणि अर्जदार यांच्या शाळेतील फिलाटली क्लबचा सदस्य असणे बंधनकारक आहे. सहभागी व्यक्तीचे पोस्ट ऑफिसमध्ये स्वतःचे फिलाटेलिक डिपॉझिट खाते देखील असले पाहिजे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी अंतिम परीक्षेत किमान ६० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांचीया योजनेसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांची आहे. प्रथम फिलाटली क्विझची लेखी परीक्षा होईल. त्या नंतर जे विद्यार्थी या लेखी परीक्षेत पात्र असतील त्यांना फिलाटेली वर आधारित प्रकल्प सर्कल कार्यालय येथे सादर करावा लागेल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन अकोला डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अकोला विभाग श्री संजय आखाडे यांनी केले आहे.