लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री: वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे सर्वसामान्य ग्राहक व ग्रामस्थ आधीच त्रस्त असताना पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत शिरपूर येथील एका शेतमजूर वीज ग्राहकाला कंपनीने १६ युनिट वीज वापरापोटी २,०९० रुपयांच्या रकमेचे वीज बिल पाठविल्याचा प्रकार १८ मे रोजी घडला आहे.शिरपूर येथील रहिवासी नूर मोहम्मद यांना दरमहा २०० ते ३०० रुपये बिल येत होते; परंतु मागील महिन्याचे वीज बिल युनिटप्रमाणे न देता अंदाजे देण्यात आले.बिलावर एकूण वापरण्यात आलेल्या वीज युनिटची संख्या केवळ १६ आहे; मात्र बिलाची रक्कम २,०९० रुपये देण्यात आली आहे. त्यामुळे युनिटप्रमाणे बिलाची रक्कम नसून, ती कितीतरी पटीने जास्त आहे यापूर्वीसुद्धा सदर वीज ग्राहकाला अनेक वेळा अंदाजे वीज बिल देण्यात आले. यावेळी प्रचंड रकमेचे वीज बिल दिले आहे. ते कमी करून घेण्यासाठी त्यांना मजुरी पाडून बिलाबाबत चौकशी करण्यासाठी सस्ती उपकेंद्र कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. सस्ती वीज उपकेंद्राचा कारभार ढेपाळला असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर वीज बिल दुरुस्त करून देणे अत्यंत गरजेचे आहे. सदर ग्राहकाला मिळालेले वीज बिल पाहून, त्याने वापरलेल्या वीज युनिटची चौकशी करून मगच त्याच्यावर अन्याय झाला काय, ते सांगता येईल. वीज बिल खरोखरच जास्त आले असेल तर जेवढ्या युनिटचा वापर झाला असेल त्याप्रमाणे बिल कमी करून देण्यात -डी.के. कंकाळ,कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, सस्ती, ता. पातूर
१६ युनिटसाठी दिले २०९० रुपयांचे वीज बिल
By admin | Published: May 22, 2017 1:31 AM