वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने व्यक्तिगत जोडणी व रोहित्र बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याला प्रतिकार म्हणून शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला होता. तालुक्यातील अडगाव येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी १६ मार्च रोजी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडगाव फिडरवर जाऊन वीज देयके दुरुस्ती नसल्याबद्दल तक्रार केली. शेतकऱ्यांना देण्यात आलेली देयके मीटर रिडींग व एनर्जी ऑडिट रिपोर्ट सोबत सुसंगत नाहीत, महावितरणने देयकांपोटी क्रॉस सबसिडी आणि सरकारी सबसिडीमार्फत ती रक्कम यापूर्वीच वसूल केली. सर्व देयके किमान ५५ टक्के तरी वाढीव असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा अन्य देयकांचा आग्रह धरून विद्युत जोडणी कापल्यास शेतकरी संघटना आंदोलन करेल असे सांगण्यात आले. त्या अनुषंगाने बुधवारी १७ मार्च रोजी तेल्हारा येथे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ललित बहाळे यांच्या नेतृत्वात कार्यालय गाठले. तेथील शाखा अभियंता आकाश गुप्ता यांच्या सोबत विद्युत देयकांबद्दल चर्चा केली. तेल्हारा तालुक्यातील शेती पंपाचे तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले. पुढे कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज तोडणार नाही अशी ग्वाही दिली. पोलीस उपनिरीक्षक कायंदे यांनी मध्यस्थी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया राज्य प्रमुख विलास ताथोड, माहिती तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, बेलखेड प्रमुख दादाभाऊ टोहरे, हिंगणीचे सरपंच हरिदास वाघ, दिलीप वानखडे, आकाश देऊळकार, उमेश कोरडे, दीपक वाघ, गणेश कोरडे, विजय ताथोड, कैलास ताथोड, संदीप ताथोड, प्रदीप लासुरकर, दिलीप वानखडे, संतोष सुशिर, राजू सुशिर, महोम्मद एजाज, अजर पठाण, हमीद टापदार, आयास टांगेवाले, मोहम्मद सादिक, बाळूभाऊ वाकोडे, प्रमोद टोहरे, करण टोहरे, सतीश माडी, निलेश सुशिर, महोम्मद फाजील, डौलात सुशिर, जाणकिराम पाटील, सुधीर साखरे, गणेश बळीराम सुशिर, अनंत तळोकार, निलेश उमाळे आदी शेतकरी उपस्थित होते.
शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:18 AM