शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वीज ग्राहकांना मोबाइलवरच सेवा!

By admin | Published: June 04, 2017 1:45 PM

३.३१ लाख ग्राहकांनी केली नोंदणी : नोंदणी करण्याचे महावितरणचे आवाहन

३.३१ लाख ग्राहकांनी केली नोंदणी : नोंदणी करण्याचे महावितरणचे आवाहनअकोला : महावितरणच्या प्रणालीमध्ये मोबाइल क्रमांक नोंदविलेल्या वीज ग्राहकांना अनेक सुविधांचा लाभ घरबसल्या मिळत असून, मीटर रिडिंग, वीज बिलाची माहिती, खंडित वीज पुरवठा अशा अनेक इतर वीज सेवेसंबंधीची माहिती ग्राहकांना थेट मोबाइलवरच एसएमएसद्वारे प्राप्त होत आहे. अकोला परिमंडलातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील ३ लाख ३१ हजार ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली असून, इतर ग्राहकांनीसुद्धा आपला मोबाइल क्रमांक नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदविलेल्या ग्राहकांना माहिती एसएमएसद्वारे इंग्रजी भाषेत मिळायची, आता वीज ग्राहकांना सोयीनुसार व निवडीनुसार इंग्रजी व मराठी भाषेतही एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांचे वीज बिल तयार होताच तत्काळ संबंधित ग्राहकांच्या मोबाइलवर एकूण वीज बिलाची रक्कम, देय तारीख याची माहिती मिळत आहे. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर दिनांक व घेतलेले मीटर रिडिंग अशा प्रकारची माहिती वीज ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर खंडित वीजपुरवठा, भारनियमन, संबंधित वीज पुरवठा बंद व सुरू होण्याची वेळ याची माहितीदेखील एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे. ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग उपलब्ध न झाल्यास त्याला याचा एसएमएस प्राप्त होणार असून, त्यानंतर ग्राहक दिलेल्या कालावधीत मोबाइल अँपद्वारे मीटरचे रिडिंग महावितरणला थेट पाठवू शकणार आहे, त्यामुळे ग्राहकाला योग्य देयक मिळणार असून, तत्काळ ऑनलाइन भरणा करता येणार आहे. मोबाइल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना कुठल्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर वैयक्तिक व इतर माहिती नोंद असल्यामुळे फक्त तक्रार सांगावी लागणार आहे, त्यामुळे तत्पर सेवा मिळण्यास मदत होणार आहे. अशी करा नोंदणीवीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदविण्यासाठी मोबाइलमध्ये ह्यएम.आर.ई.जी.ह्ण हा शब्द कॅपिटलमध्ये टाइप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा व ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवून द्यावा. तसेच १८00२३३३४३५/१८00२00३४३५ व १९१२ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणी करता येते. महावितरणचे संकेतस्थळ तसेच मोबाइल अँपवरही नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.सर्व सेवा व सुविधा प्राप्त होण्यासाठी वीज ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद करणे अत्यावश्यक आहे. वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदवावा तसेच मोबाइल अँपचाही वापर वाढवावा.-अरविंद भादीकर, मुख्य अभियंता, अकोला.