नकाशी जि. प. शाळेत भीम जयंती
बाळापूर : तालुक्यातील नकाशी जिल्हा परिषद शाळेत १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका विमल डोंगरे, शाळा समिती अध्यक्ष शीतल तायडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव तायडे, सुभाष कळंब, गजानन वानखडे, सीमा पांडे आदी उपस्थित होते.
महान येथे कोरोना लसीकरण सर्वेक्षण
महान : बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे कोविड-१९ कौटुंबिक लसीकरणाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. शासनामार्फत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. शिक्षकांमार्फत कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. गावात खालीद बिन वलीद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शाहीद इकबाल जनजागृती करीत आहेत.
हिवरखेड येथे आगीत किराणा दुकान खाक
हिवरखेड : येथील विकास मैदानावरील एका किराणा दुकानाला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. आगीत दुकानातील माल व इतर साहित्य जळून खाक झाले. नागरिकांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. दुकानाचे मालक अर्जुन खिरोडकर, चिंतामण खिरोडकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पारस येथे युवकांचे रक्तदान
पारस : येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नरेंद्र इंगळे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात ९४ युवकांनी रक्तदान केले. यावेळी नारायण खंडारे, अविनाश खंडारे, किशोर वानखडे, रवी खांडेकर, सतीश हातोले, प्रभाकर अंभोरे, पंकज तेलगोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उरळ येथे सम्राट ग्रुपतर्फे रक्तदान
उरळ : येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्त सम्राट ग्रुपच्या वतीने ग्राम सचिवालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रामभाऊ माळी, आनंद पुंडे, सुनील वानखडे, तायडे, महेंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.