रौंदळा : अकोट तालुक्यातील मुंडगाव फिडरअंतर्गत येत असलेल्या रौंदळा, निंबोळी, दापुरा, पारळा या गावांमधील वीजपुरवठा दररोज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस असो अथवा नसो, तरीसुद्धा सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. परिसरातील वीजपुरवठा दिवस-रात्र खंडित होत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभामुळे येथील नागरिकांना दररोज अंधाराचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दररोज गावातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विजेचा पुरवठा कधीही खंडित करण्यात येतो. मध्यरात्रीदरम्यान अचानक वीज गायब होते. रात्री अंधार असल्याने साप, विंचू व इतर कीटकांपासून इजा होण्याची शक्यता आहे. रौंदळा येथील वीजपुरवठा मुंडगाव फिडरला जोडल्यापासून परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल, असा इशारासुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे.
रौंदळा परिसरात विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:14 AM