पातूर : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी तीन ठिकाणी महिला, चार ठिकाणी पुरुष सरपंचपदी विराजमान झाले. मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने चार ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले.
शिर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अर्चना सुधाकर शिंदे यांची अविरोध निवड झाली. उपसरपंचपदी कल्पना ज्ञानेश्वर खर्डे या नऊ विरुद्ध आठ मतांनी विजयी झाल्या. भंडारज खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभा रमेश तेलगोटे, उपसरपंचपदी संगीता पुंडलिक शेंडे यांची अविरोध निवड झाली. चांगेफळ सरपंचपदी मोहम्मद नाहीद अंजुम मोहम्मद आसिफ, उपसरपंचपदी किरण महादेव काळे यांची अविरोध निवड झाली. बेलुरा खुर्द सरपंचपदी धम्मपाल रामचंद्र इंगळे, उपसरपंचपदी नागेश पुरुषोत्तम साबे यांची अविरोध निवड झाली. चान्नी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत शांताराम तायडे, उपसरपंचपदी सुनंदा प्रल्हाद येनकर यांची अविरोध निवड झाली. मलकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रमेश त्र्यंबक चव्हाण, उपसरपंचपदी वच्छलाबाई रावलसिंग राठोड यांची अविरोध, मळसूर सरपंचपदी शिवाजी सुखदेव देवकते, उपसरपंचपदी कांताबाई नामदेव कंकाळ यांची अविरोध, आलेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमातीचा उमेदवारच नसल्याने उपसरपंचपदी मोहम्मद रियासतबी जलालुद्दीन यांची अविरोध निवड झाली. चरणगाव ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीचा उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे सरपंचपद रिक्त राहिले. उपसरपंचपदी वैशाली दीपक इंगळे यांनी ६ विरुद्ध ३ मतांनी विजय मिळविला.
हिवरा ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीचा उमेदवार निवडून न आल्याने सरपंच पद रिक्त राहिले. उपसरपंचपदी अमर पजई ७ विरुद्ध ४ मतांनी विजयी झाले. दिग्रस खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीचा उमेदवार नसल्याने रिक्त राहिले. उपसरपंचपदी उपसरपंचपदी शशिकलाबाई महल्ले ४ विरूद्ध ३ मतांनी विजयी झाल्या.
त्यामुळे तीन ठिकाणी महिला सरपंच आणि तीन सरपंच रिक्त असलेल्या गावी तीन महिला उपसरपंच झाल्या.
चरणगाव येथील उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यामध्ये जि. प. सदस्य गटाकडे उपसरपंचपद गेले.
अध्यासी अधिकारी म्हणून येथे नायब तहसीलदार सय्यद, सहायक निवडणूक अधिकारी राहुल उंदरे, तलाठी उखळकर यांनी काम पाहिले.
फोटो: