वाडेगाव: येथील पोलीस चौकीअंतर्गत येत असलेल्या चान्नी फाटा-वाडेगाव रस्त्यावरील स्थानिक पेट्रोल पंपनजीक रस्त्यावर मुरुम टाकणाऱ्या ट्रकमुळे ११ केव्ही वीजतारा तुटल्या होत्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. गत चार दिवसांपासून शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठी सुरळीत करण्याची मागणी होत आहे
ट्रकमुळे शुक्रवारी वीजतारा तुटल्या होत्या. तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. ट्रकचा धक्का लागल्याने झालेल्या अपघातात तीन-चार खांब वाकले असून, ताराही तुटल्या होत्या. या प्रकाराकडे स्थानिक विद्युत कर्मचाऱ्यांनी रविवारी लोखंडी खांब उंची वाढविली. कर्मचाऱ्यांकडून उशिरापर्यंत काम सुरू होते. वृत्त लिहिस्तोवर वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)