शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

६४३ पाणीपुरवठा योजनांवर वीजपुरवठा खंडितची टांगती तलवार

By atul.jaiswal | Published: September 01, 2021 10:34 AM

Power supplye of over 643 water supply schemes will be disconnected : थकबाकीची रक्कम न मिळाल्यास येत्या गणेशोत्सवापूर्वी यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजि.प. शाळा व पथदिव्यांचीही बत्ती होणार गूल एकूण थकबाकी ९९ कोटींच्या घरात

अकोला : जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे आणि जिल्हा परिषद शाळांकडे ९९ कोटी रुपयांची थकबाकी झाल्याने महावितरणकडून कठोर पावले उचलण्यात येणार असून, थकबाकीची रक्कम न मिळाल्यास येत्या गणेशोत्सवापूर्वी यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत ६४३ वीज जोडण्या असून, त्यांच्याकडे १४ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. बाळापूर उपविभागात ११० सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत सुमारे २ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अकोट उपविभागात १०६ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत ३ कोटी ६२ लाख रुपये, तेल्हारा उपविभागातील १३८ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत सुमारे ४ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

जिल्ह्यातील १०३१ पथदिव्यांच्या जोडण्या विविध ग्रामपंचायतीकडे आहेत. याची थकबाकी ८२ कोटी ६५ लाख रुपये आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात या जोडण्यांनी ९३ लाख रुपयांची वीज वापरली आहे. अकोला ग्रामीण विभागात ७२५ पथदिव्यांच्या जोडण्या असून यांची थकबाकी ६९ कोटी रुपयांच्या घरात आहे. अकोट विभागात ३०६ जोडण्या असून यांची थकबाकी १३ कोटी ८८ लाखांच्या घरात आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची थकबाकीही वाढली आहे. जून अखेरीस ६५१ शाळांकडे ३१ लाख ६९ हजार रुपये थकबाकी आहे. मूर्तिजापूर उपविभागातील १११ जिल्हा परिषद शाळांकडे ५ लाख ११ हजार रुपये, अकोट उपविभागात १०८ शाळांकडे ७ लाख ९ हजारांची थकबाकी आहे. वरील थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून सर्व अधिकारी सतत पाठपुरावा करीत आहेत. जर थकीत देयकाची रक्कम वसूल न झाल्यास आगामी काळात महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागणार आहे.

जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी महावितरणकडून जिल्हा परिषदेकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून थकबाकीची माहिती देऊन ती वसूल व्हावी यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. ६ ऑगस्ट रोजीच्या शासन आदेशाची प्रतही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यानुसार सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांची चालू देयकाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरायची आहे. यासंदर्भात दिरंगाई झाल्यास स्थानिक सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने पथदिवे आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची चालू देयके विहित कालावधीत भरावीत, असे यात स्पष्ट नमूद केले आहे.

अशी आहे थकबाकी

ग्राहक             जोडणी थकबाकी

पाणीपुरवठा योजना - ६४३            १४ कोटी ८२ लाख

पथदिवे -             १०३१ ८२ कोटी ६५ लाख

जिल्हा परिषद शाळा - ६५१ ३१ लाख ६९ हजार

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोला