लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला. त्यामुळे जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणे पातूरच्या नगराध्यक्षांना चांगलेच भोवले.नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९-अ अंतर्गत तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जात पडताळणी कायदा २००० (२३/१/२००१) आणि कलम १० (४) अंतर्गत पातूर नगरपालिकाच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांना अपात्र घोषित करण्याची याचिका पातूर येथील नईम खान जहागीर खान यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अर्जासोबत प्रभा भीमराव कोथळकर यांनी माहेरचे जातीचे प्रमाणपत्र सादर न करता सासरकडील जातीचे प्रमाणपत्र सादर केले. जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय जात पडताळणी अधिनियम २००० (२३/१/२००१) कलम १० (४) अन्वये पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १३ मार्च रोजी दिला. त्यामुळे जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणे पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा कोथळकर यांना चांगलेच भोवले. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. संतोष रहाटे यांनी काम पाहले.
पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा कोथळकर अपात्र; जिल्हाधिका-यांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:46 AM
अकोला : जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला. त्यामुळे जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणे पातूरच्या नगराध्यक्षांना चांगलेच भोवले.
ठळक मुद्दे जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणे भोवले